दैनिक चालू वार्ता:-रिसोड तालुका प्रतिनिधी:-भागवत घुगे
रिसोड:- तालुक्यातील कोयाळी येथे बुद्ध विहार यांचे मोठ्या थाटात उद्घाटन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदरणीय भंतेजी नागसेन यांनी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली आणि मार्गदर्शन केले.या बुद्ध विहारामुळे संपूर्ण समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही . प्रगती होईल आणि आज पासून या गावच्या विकासासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे यामुळे सर्वांची समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही ही तथागतांची शिकवण सर्वांनी अंगी करावी आणि हे बुद्ध विहार पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व हे बांधकाम बुद्ध विहार पूर्णत्वास नेण्याचा सर्व गावकऱ्यांनी संकल्प केला .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दत्तरावजी धांडे साहेबांनी कोयाळी हे गाव चळवळीचा एक केंद्र म्हणून महत्त्वाचं आहे या गावाच्या तिसऱ्या पिढीपर्यंत सर्व चळवळीत काम करणारी मंडळी या गावात आहे .आजचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. महादेवराव ठाकरे मवाळ सर रंगनाथ धांडे शालिग्राम पठाडे यांची भाषणे झाली कार्य क्रमाला नरहरी पाटील सरपंच परसराम इंगळे रतन घटकांनी श्रीधर बाजार पोलीस पाटील जनार्दन बोरकर दामू अण्णा शंकरराव बोरकर प्रदीप जाधव मारुती लादे डॉक्टर श्याम गटाने नितीन बोरकर विजय बोरकर केशव बोरकर सदानंद वाघ गजानन बाजड रेखे साहेब गायकवाड साहेब ठेकेदार इंजिनीयर दिपके साहेब स्वप्निल कांबळे तसेच नावली जांब गोवर्धन व पंचक्रोशीतील असंख्य मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमासाठी गावातील नवयुवक पंचशील मंडळ कोयाळी खुर्द व संपूर्ण गावकरी मंडळीनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पवार यांनी केले तर आभार समाधान पोघे सरांनी केले.
