दैनिक चालू वार्ता:- तालुका प्रतिनिधी – भागवत घुगे
वाशिम जिल्ह्याचा 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दिनांक 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत पंडित नेहरू विद्यालय कवठा -चिखली तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी रिसोड तालुक्यातील विविध शाळेच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय जिल्हा मेळावा पूर्वतयारी शिबिर पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली तालुका रिसोड येथे घेण्यात आला..
या शिबिरास उपस्थित सर्व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना जिल्हा मेळावा पूर्वतयारी व मेळाव्यादरम्यान आयोजित विविध स्पर्धेतील सहभाग याबाबत जिल्हा संघटक श्री के एल पवार, मुख्याध्यापक श्री भगवानराव गि-हे,जेष्ठ स्काऊट मास्टर सर्वश्री बबन आघाव, मंगेश महाजन, पी टी शिंदे , प्रमोद राठोड सविस्तर यांनी मार्गदर्शन केले.
या पूर्वतयारी शिबिरात रिसोड तालुक्यातील 38 शाळेतील 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यापैकी 250 विद्यार्थी स्काऊट गाईड गणवेशात उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यावर्षी जिल्हा मेळाव्यात सर्व विद्यार्थी व शिक्षक शंभर टक्के गणवेशात उपस्थित राहणार आहे त्या दृष्टीने तयारी चालू आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
===================
