दै.चालु वार्ता
प्रतिनिधी राम पाटील क्षीरसागर
नांदेड / लोहा :- आडगाव येथील शालेय समितीचे अध्यक्ष राम पाटील क्षीरसागर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशाची सेवा करणारे सैनिक , सेवानिवृत्त अधिकारी , शिक्षक , पञकारांचा सम्मान सोहळा दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व्हि आर घोडके ( सेवानिवृत्त सैनिक ) , कॅप्टन डि एस वाघमारे ( सेवानिवृत्त सैनिक ) , सुभाष उन्हाळे ( पोलिस ( सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहा ) साहेबराव वाघमारे , ( सेवानिवृत्त सैनिक ) गुलाबराव मोटे ( सेवानिवृत्त शिक्षक , आर .के क्षीरसागर ( सेवानिवृत्त शिक्षक ) एल एस क्षीरसागर ( सेवानिवृत्त शिक्षक ) माधव भालेराव ( संपादक हिंदवी बाणा ) गोविंद पा पवार ( उपसंपादक दै चालु वार्ता ) बालाजी धनसडे जेष्ठ पत्रकार तथा संपादक ) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती वरील सत्कार मुर्तीचा सत्कार स्वातंत्र्यदिनी करण्यात आला आडगाव यावेळी आलेल्या पाहुण्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले गावातील प्रतिष्ठीत नागरिक , सरपंच , उपसरपंच , सदस्य , पोलिस पाटील , चेअरमन , सोसायटी सदस्य , अंगणवाडी शिक्षिका सेविका , सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सर्व मंडळीनी सदरील कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री आर.गिजे केले तर सूत्रसंचालन गोणारे सर यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गोणारे सर कोंडे सर ,पुरी सर ,
मंगनाळे सर, उपाध्यक्ष दिलीप धनसडे मेघराज पाटील क्षीरसागर, सर्व सदस्य, बंडु अप्पा बोमनाळे,जगन क्षीरसागर, बाळा पाटील क्षीरसागर यांनी मेहनत घेतली आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष पत्रकार राम पाटील क्षीरसागर मांडले…
