दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल मध्ये आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थी परिषदेतील सदस्यांचा पदग्रहण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व सन्माननीय श्री.पी.के जाधव सर उपस्थित होते. त्यांच्या समवेत इतर मान्यवर डॉ.शिवराज एकलारे, डॉ. अनघा पाटील,नांदेड येथील प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रमोद झुंजारे, शालेय व्यवस्थापक मंडळातील सदस्य डॉ.दिनेश प्रतापवार, डॉ.नामदेव भुरे,डॉ.कपिल एकलारे,डॉ.अविनाश घोडके डॉ. विजय मिसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक राष्ट्रगीत गाण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य,सामूहिक गीत गायन व विविध वाद्य वाजविणे,विविध महापुरुषांच्या वेशभूषा,इत्यादी कार्यक्रम सादर करून प्रमुख पाहुणे, मान्यवर व पालकांची वाहवा मिळविली.यात प्रामुख्याने संपूर्ण राष्ट्रगीत, वंदे मातरम नृत्य,लेहराओ झेंडा,नेताजी सुभाष चंद्र बोस (द फरगॉटन आर्मी), देश हमारा, भाषण, विद्यार्थी लिखित कविता सादरीकरण इ.चा समावेश होता.
या कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थी परिषदेतील सदस्यांना पदग्रहण व शपथविधी संपन्न झाला. यात स्कूल हेड बॉय,स्कूल हेड गर्ल,डेप्युटी हेड बॉय , डेप्युटी हेड गर्ल,शाळेतील चार हाऊस- एक्वा,इग्निस, व्हेंटस,टेरा या हाऊस मधील कॅप्टन,व्हाईस कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन बॉय, स्पोर्ट्स कॅप्टन गर्ल व प्रिफेक्टस यांना सुशोभित करून शपथ देण्यात आली.यानंतर पारितोषिक वितरणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्य व जिल्हा स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला.
या नंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाळेचे प्राचार्य.श्री.सचिन कोल्हे,उपप्राचार्य श्री.महेश बरे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे श्री.पी.के जाधव सर म्हणाले कि, एस.पी.एल.एस या शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहून आपण भारावून गेलो आहोत.देगलूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आजचे सादरीकरण हे शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा खूप सुंदर व सरस आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून शिक्षकांनी मेहनत घ्यावी . या ज्ञान मंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.सूत्रसंचालन आरुषी चिद्रावार, रोहित पाटील, ज्योती हांडे,अनुष्का केर्ले यांनी केले तर आभार श्री.महेश बरे यांनी मानले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री राहुल कदम,श्री. पवन कांबळे, क्रीडा शिक्षक श्री.शेलेंद्र कुकडे,श्री. आकाश येनवाल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
