दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मुख्य संपर्क प्रमुख भरत पाटील पवार…
१५ ऑगस्ट या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने शहिद जवान विलास मोरताटे यांचे नातेवाईक भगवान पिराजी मोरताटे,सायाळ ता, लोहा येथील युवा प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित लीलाधर महाराणीया कमांडो व आम्ही शहीद विलास मोरताटे यांच्या गावातील प्रगतिशील शेतकरी म्हणून आम्हाला आमंत्रित केले आणि 75 वृक्षांची लागवड प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील सायाळकर व भगवान पिराजी मोरताटे नेहरू युवा केंद्राच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष रावळकर मॅडम प्रशिक्षण केंद्रातील सुमारे दोनशेच्या वर जवान उपस्थित होते केंद्रीय प्रशिक्षण विद्यालयाचे नियोजन पाहून मलाही देश सेवा करण्याची इच्छा झाली पण आम्हीही मातीची सेवा करतो या गोष्टीचा मला अभिमान वाटला मी जरीही देश सेवेत जाऊ शकलो नाही तरीही माझी वैयक्तिक इच्छा आहे की माझे मुले शंभर टक्के देश सेवा त्यांच्या मनामध्ये रुजवून ह्या भारत मातेची सेवा करण्यासाठी मी देश सेवेत पाठवीन आणि जोपर्यंत माझ्या शरीरात जीव आहे तोपर्यंत मी निस्वार्थ मातीची सेवा करत राहील अशी शपथ मनात ठेवून मी रत्नाकर पाटील ढगे व शहीद जवान विलास मोरताटे यांचे नातेवाईक भगवान पिराजी मोरताटे यांना शासकीय वाहनातून सायाळ येथे परत पाठविण्यात आले…
