दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी राम कराळे.
नांदेड/(लोहा)भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी गजानन पाटील कराळे (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव) यांच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.तसेच गावातील पहिले सैनिक मारुती काशिनाथराव पाटील कराळे यांच्या मातोश्री निर्मलाताई काशिनाथराव कराळे यांचा सत्कार शाळेच्या वतीने व सर्व गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच आदरणीय तुकाराम पाटील कराळे माजी सरपंच सतीश पाटील कराळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव पाटील कराळे उपाध्यक्ष गोविंदराव पाटील कराळे तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अच्युतराव पाटील कराळे सामाजिक कार्यकर्ते राजाराम पांचाळ सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य,आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील सर्व तरुण वर्गांच्या उपस्थितीत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला…
