दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
नांदेड, मुखेड सावरगांव पिर येथील पुतळा माता प्राथमिक विद्यालय सावरगाव (पिर) येथे आज दि. 15 ऑगस्ट रोजी 76 स्वतंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण कार्याक्रमास भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचावाटा असलेले महात्मा गांधीजी यांच्या प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहण कार्यक्रमास सुरुवात केली. या ध्वजारोहण कार्यक्रम या संस्थेचे अध्यक्ष संत रामराव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावरगांव नगरीचे भूमिपुत्र मिलटरीमँन माजीद मुजावर हे होते यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बाबुराव कबीर, गंगाबाई माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी सर व सर्व सहशिक्षक,मुखबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनकांबळे सर, व सर्व सहशिक्षक, श्री सदगुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य रमेश चव्हाण,व सर्व प्राध्यापक, गावातील पालक, मारोती केंद्रे, विठ्ठल ढुमणे,सुनील राठोड, योगेश राठोड,देवीदास मुसांडे, बालाजी मुसांडे, हे उपस्थित होते. ह्या ध्वजारोहण कार्यक्रम नंतर काही विध्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने देश रंगीला रंगीला, संदेशे आते है हमे तडपाते है चिठ्ठी आती है, एकच राजा येथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या गाण्यावर लेझीम सादरीकरण केले व विध्यार्थींच्या भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप चौधरी सर यांनी केले. यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाबद्दल कुमारी मनीषा कबीर,पल्लवी केंद्रे या विद्यार्थिनीने आपले विचार मांडले सदगुरू सेवालाल महाराज काँलेजचे प्राचार्य आर. पि. चव्हाण, पि.पि.राठोड,सर्व प्राध्यापक, व मुख्याध्यापक डि. के. चव्हाण सर, प्रताप चौधरी सर, रघुनाथ राठोड, व्यंकट वारे,बस्वराज घेवारे बालाजी पाटील, आयुबखान पठाण, सौ.छाया कबीर,बागवान मँडम,चमकुरे मँडम हे सर्वजण उपस्थित होते. शाळेतील विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या, भाषण स्पर्धात सहभागी झालेले व देशभक्ती गाण्यावर लेझीम सदर करणारे विध्यार्थ्यांना वही, पेन शालेय साहित्यचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बस्वराज घेवारे सर यांनी केले.
