गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा
15 August 2023, स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9.वा. सायाळ ग्रामपंचायत कार्यालय येथे, मराठा समाजातील वंचित घटकांपर्यंत ‘सारथी’ चे विविध प्रशिक्षण, उपक्रमांची माहिती देत सारथींच्या योजनाचा लाभ घ्या असे, अवाहन ग्रामसेवक डि.पी. राठोड साहेब यांनी केले आहे. छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात (सारथी) यांच्यावतीने, मराठा, कुणबी मराठा – कुणबी व. कुणबी- मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांची माहिती मराठा समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सारथीने १५ ऑगस्ट, रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र दिले होते. त्यानुसार सायाळ ग्रामपंचायत अंतर्गत, OMSAI Infotech LOHA, येथील विद्यार्थी अदिनाथ रावसाहेब पवार याने, ग्रामपंचायत सायाळ येथे विविध उपक्रम प्रशिक्षण व योजनाची माहिती देऊन जास्तीत जास्त वंचित घटकांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. यात सारथी व MKCL तर्फे CSMS – DEEP. हा 30 हजार रुपये किमतीचा सहा महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम १८ ते ४५ वयोगटातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोफत सुरू झाला आहे. तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांने सारथींच्या विविध योजनांचा व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत : मुख्यमंत्री : एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री : देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री : अजितदादा पवार सारथींचे व्यवस्थापकीय संचालक – अशोक काकडे व एमकेसीएल नांदेड जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव. ओमसाई इन्फोटेक चे संचालक. माधव फुलवरे यांचे आभार अदिनाथ पवार यांनी मानले.
यावेळी सरपंच. श्रीः अण्णासाहेब दत्तात्रय पवार, माजी सरपंच प्रतापसिंह गुलाबसिंह ठाकूर ग्रामसेवक : डी.पी राठोड सर. उपसरपंच :. मारोती कन्हाळे, माधवराव मोरताटे सदस्य : मारोती मोरतळे, गंगाधर ‘पवार, सदस्य सौ. राठोड. मॅडम, चिंचोरे मॅडम, छायाबाई पवार, सुशिलाबाई राठोड व तं मु.अ. ज्ञानेश्वर पवार.. रावसाहेब पवार गणपत पवार, गौतम ढगे व तसेच गावातील सर्व शिक्षक वर्ग, आणि अंगणवाडी सेविका:- पवार मॅडम व गावातील सर्व : नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
