सतिशभाऊ आनंदराव मिञपरीवाराचा सतत ९ वर्षांपासुन पुढाकार
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – सतीश आनेराव मित्र परिवार लोहाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ७६ जणांनी रक्तदान करून सलग नवव्या वर्षीही रक्तदान भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
लोहा पोलीस ठाण्याच्या समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची उपस्थिती लाभली.प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. उद्घाटक लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे,फौजी भारतीय सेनादल सुकेश शेटे, प्रकाश केंद्रे, बालाजी चोंडे, सेवा निवृत्त फौजी नाना मामा चिवळे पार पडले.
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता फारुख अहमद, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार,सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील कानवटे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष रमेश माळी, उद्योजक विशाल भाऊ नळगे, डॉ. वीरभद्र एकलारे, पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, डॉ. शिवाजी मंगनाळे होते.
तसेच भव्य रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, भटक्या विमुक्त जाती जमाती संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉ.संजय बालाघाटे, वंचित बहुजन आघाडी उपजिल्हाध्यक्ष विहान पाटील कदम, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शेटे, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख युवराज वाघमारे, युवा उद्योजक मुन्ना होनराव, वंचित बहुजन आघाडी नांदेड चे महानगराध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड, कैलास वाघमारे ,युवा जिल्हाध्यक्ष धिरज हाके,अल्पसंख्यांक सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष शरफोद्दीन शेख, राम पाटील शिरसाट मजरा सरपंच, नामांकित साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर डाखोरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम आदीची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदरील सतीश भाऊ आनेराव मित्र परिवार लोहाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात एकूण तब्बल ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.हुजुर साहिब ब्लड बँक नांदेड चे कर्मचारी यांनी रक्त संकलन केले.
यावेळी बालाजी जाधव ,सदानंद धुतमल, ओम साखरे, प्रकाश पाटील, राजेश शिरसाट, संतोष कंकरे ,हानमंत आरळे, मलकु आप्पा मटके, राहुल भीसे, मारोती गोवींदपुरे विकास आनेराव ,नागनाथ विश्वासराव ,शिवसांब बोंडारे, नीतिन आनेराव संजय शेटे, गंगाधर कहाळेकर, वीहान कदम,माधव जीरेवार ,रूद्रा संघमे ,पीन्टु वड्डे, आन्वर पठान,बबन जोंधळे,शहाजी बापु राठोड, बालाजी आनेराव आदींनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजक सतिश भाऊ आनेराव तर सुत्रसंचलन बापू गायकर ,वैजनाथ पांचाळ यांनी केले.
