बळीराजाच्या नजरा आकाशाकडे…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे..
जालना (मंठा) तालुक्यात पावसाळा लागून अडीच महिने उलटून अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने चिंतेचे वातावरण या तालुक्यांत पसरले आहे. पावसानं मारलेली दांडी वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. थोडयाफार पाऊस झाला होता त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा एक थेंबही नाही. तसेही यंदा अनियमित पावसामुळे शेतकरी राजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यंदाच्या अनियमित पावसामुळेसुद्धा असंख्य अडचणींचा सामना करून शेतकरी पीक जगवत आहे. पावसाने दिलेली भूल, वातावरणात झालेल्या बदलाचा फटका यंदा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनाबसला आहे. स्वायाबीन पिकाने माना टाकल्या तर कपाशी भोई सोडेना अशा विपरीत परिस्थितीत पिकाचं उत्पन्न येईलच, हे सांगणे अशक्य असून तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असल्याचं चित्र सध्या आहे. तर ज्यांच्याकडे पाणी देण्याची सोय उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पीक जगवण्यासाठी स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यात येत आहे, तर यंदा लावलेला खर्चसुद्धा निघेल की नाही, हे सांगणेसुद्धा कठीण झाले आहे. शेतकरी चारही बाजूनी कोंडीत सापडला आहे. तरी अशा विपरीत परिस्थितीत प्रशासनाने जागृत होऊन पिकाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
