दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (धर्माबाद) :- खरीप हंगाम २०२३ अंतर्गत धर्माबाद तालुक्यातील हुंडा येथे शेती शाळा आयोजित केली होती. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा ईंन्द्र मणी यांनी धर्माबाद तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे पीक प्रात्यक्षिके व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतीपुर्ती सप्ताह, जनजागृती कार्यक्रमासाठी हुंडा येथे कर्टुले प्रात्यक्षिक व संजय पा शेळगावकर यांच्या शेतात विद्यापीठ संशोधीत सोयाबीन -६१२ बीयाणे प्रात्यक्षिके पाहणीसाठी आले होते. संजय पा शेळगावकर यांच्या शेतात छोटेखानी शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.सत्कार समारंभानंतर मा.ईंद्रा मणी कुलगुरू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिले.मा ईंन्द्र मणी परीवार समवेत श्री क्षेत्र ज्ञान सरस्वती मंदिर बासर तिर्थक्षेत्र येथे जाऊन दर्शन घेतले.सोबत मा.डाॅ. बेग सर कापूस संशोधन केंद्र, नांदेड चे प्रमुख,मा रविंद्र देशमुख, मा डॉ संजय देवकुळे व तालुक्यातील सहायक कषी अधिकारी जाधव ,चंदापुरे , कृषी सहायक, गणेशराव पाटील करखेलीकर, रविंद्र पोतगंटीवार,पीराजी पा चव्हाण, शिवराज पा गाडीवान व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
