दै.चालु वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना रोजी सकाळी ठीक 6:30 वाजता शाळेतून प्रभात फेरीला सुरुवात झाली. गावात प्रभात फेरीच्या वेळी विठ्ठल हाके ,देवकते राम ,सलगर हरीओम, मारकड सोहम ,देवकते प्राची या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद,म.गांधीजी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर,पं. जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले यांची सुंदर *वेशभूषा करून ग्रामस्थांची मने जिंकली.सर्वप्रथम जय मल्हार सार्वजनिक वाचनालय येथे श्री. किशन वडारे यांच्या हस्ते, ग्रामपंचायत कार्यालय येथे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच *श्री व्यंकटरावजी हाके* यांच्या हस्ते , शहीद जवान रामनाथ हाके या ठिकाणी भारतीय जवान श्री खंडू सलगर यांच्या हस्ते,शहीद जवान सूर्यकांत टाळकुटे या ठिकाणी भारतीय जवान अमोल हाके यांच्या हस्ते व अंगणवाडी येथे अंगणवाडी ताई श्रीम. मुक्ताबाई सलगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता जि. प.प्रा. शाळा मष्णेरवाडी येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोमासे दत्तात्रय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत आणि मराठवाडा गीत यांचे *सामूहिक गायन* केले. त्यानंतर उपस्थित सर्वांना निपुण भारत ची शपथ देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. ज्ञानोबा नरवटे ( शा.व्य.स.अध्यक्ष),तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच श्री व्यंकटराव हाके, उपसरपंच राजाराम देवकते, माजी उपसरपंच हुलाजी देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष धारबा हाके, माजी सरपंच व्यंकटराव देवकते, शा.व्य.स. उपाध्यक्ष शिवराज…
