म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – श्रीवर्धन म्हसळा हमरस्त्यालगत निसर्गाचे सानिध्यात वसलेल्या छोटे खानी वाडांबा गावाच्या रहिवाशी सोनल महेश घोले यांची जिल्हा नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन मतदार संघाचे जिल्हा महीला अध्यक्षा पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सुतारवाडी गीता बाग येथे पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँगेस जिल्हा महीला संघटनेच्या अध्यक्षा उमा मुंडे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सोनल घोले यांना सुपुर्त करण्यात आले.नियुक्ती पत्र देताना जिल्हा अध्यक्षा उमा मुंडे,जिल्हा महीला संघटक,रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अपेक्षा कारेकर,म्हसळा तालुका महिला अध्यक्षा मिना टिंगरे आदी जिल्हा व तालुका महीला पदाधिकारी उपस्थित होते.सोनल घोले यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात आपणाकडून उप मुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष तथा कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी व मजबूत करण्यासाठी,संघटना वाढीकरिता जोमाने कार्यरत रहाल असे आवाहन करून अध्यक्षा निवडीबाबत अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.सोनल घोले यांनी मागील पाच वर्षात म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पदी,सालविंडे ग्राम पंचायत सरपंच आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस पदावर कार्यरत राहुन पक्षाला अपेक्षित अशी चमकदार कामगिरी बजावली होती. त्यांचे संघटन कौशल्य,अनुभव आणि कार्यक्रमांचे नियोजनातील सातत्य पाहून खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी सोनल घोले यांची पक्षात जिल्हा चिटणीस पदावरून श्रीवर्धन मतदार संघाचे महीला संघटन अध्यक्षा पदावर नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.सोनल घोले यांची अध्यक्षा पदी निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांतर्फे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
