दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालया मध्ये १० वा जागतिक योगदिन महोत्सव दि. २१ जून २०२४ रोज शुक्रवार सकाळी ६.४५ ते ८.०० या वेळेत आयोजन करण्यात आले होता. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमाकेअर सेंटर देगलूर येथे उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष विभाग, पतंजली आरोग्य केंद्र, स्वच्छतेचा जागर ग्रुप, समृद्धी कॉलेज ऑफ नर्सिंग अॅन्ड पॅरामेडीकल सायन्स, यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात हर्ष उल्हासात साजरा करण्यात आले, या
जागतिक योगदिन महोत्सवचे उद्घाटक, अध्यक्ष म्हणून मा.डॉ. नरेश देवणीकर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर हे होती .डॉक्टर देवणीकर यांच्या अध्यक्ष खाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम धन्वंतरी देवाचे पूजन करून उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ध्यानधारणे पासून ते अनुलोम विलोम, ताडासन, वज्रासन, सूर्यनमस्कार, चक्रासन, भुजंगासन, असे अनेक योगाचे प्रकार केले.मा.डॉ. रमेश गवाले तालुका आरोग्य अधिकारी, देगलूर,मा.डॉ. मल्लिकार्जुन रकटे निमा राज्य कार्यकारिणी सदस्य,मा.डॉ. शारंग महाराज देगलूरकर हिमा ता. अध्यक्ष देगलूर,मा.डॉ.एम.एच.पाटील अध्यक्ष डॉ. असोसिएशन, देगलूर,मा.डॉ. राहल माका निमा उपाध्यक्ष, नांदेड,मा. सुर्यकांत सुवर्णकार स्वच्छतेचा जागर ग्रुप, यांनी योग अभ्यासात सहभाग घेतला .या योग अभ्यासाला
योगतज्ञ म्हणून
डॉ. संजय लाडके, डॉ. ऐश्वर्या बुक्काबार, श्रीमती रेणुका धुमाळे, श्रीमती अॅड. छाया पाटील, कु. अॅड. जयश्री बाबळे यांनी मार्गदर्शन केले.
