दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“सोहम योगा क्लासेस चा अभिनव उपक्रम”
अंबाजोगाई येथे आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एक दिवसीय योग शिबिर सोहम योगा क्लासेस तर्फे आयोजित करण्यात आले होते यावेळी उद्घाटक म्हणून ॲड बाळासाहेब लोमटे,प्रमुख पाहुणे राहुल मोरे, अजित देशमुख ,महेंद्र निकाळजे, शिवाजीराव डोईफोडे हे होते. यावेळी मान्यवरांनी योगाचे महत्त्व विशद केले. यावेळी हॉलीबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक योग गुरु डॉक्टर संतोष कदम सर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आजच्या या धकाधकीच्या काळात प्रत्येक ठिकाणी माणसाला ताण होत आहे व तान रहित जीवन जगण्यासाठी योग साधना किती महत्त्वाची त्याचे महत्व डॉक्टर संतोष कदम सर यांनी पटवून दिले व जर आपल्याला सुदृढ जगायचे असेल तर योग करणे हा एकमेव सोपा उपाय आहे असे त्यांनी सर्व तरुण वरिष्ठ ज्येष्ठ व बालकांना सांगितले सदर शिबिरात लहान मुले ,तरुण , ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. योगसाधनेचे मूल उगम स्थान भारत देशातच आहे नागरिकांनी आपल्या निरोगी आयुष्यासाठी नियमित योगाभ्यास करावा असे आव्हान डॉक्टर संतोष कदम सर यांनी केले.
व सर्वांनी योगा करून आनंदी निरोगी जीवन जगावे अशा शुभेच्छा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरांनी सर्वांना दिल्या…
