दै. चालू वार्ता,
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
पैठण : शहराची हद्द वाढवायची असेल तर शहराला दोन वेळा पुरेसे पिण्याचे पाणी स्वच्छ पुरविणे, नियमित सांडपाणी नाल्या स्वच्छ करणे, प्रत्येक गल्लीतील रस्ते चांगले ठेवणे, प्रत्येक गल्लीतील लाईट व्यवस्था चोख ठेवणे इत्यादी बाबीची पूर्णतः अंमलबजावणी करण्याचा कृती कार्यक्रम शासनाला नगरपरिषद पैठण जोपर्यंत लेखी देणार नाही तोपर्यंत हद्द वाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येऊ नये अशी मागणी प्रतिसाद संघटनेने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना ते पैठण येथे दि. 21 शुक्रवारी आले असता लेखी निवेदन देऊन केली आहे. निवेदनात पुढील मागण्या आलेल्या करण्यात आल्या-
पैठण शहरातील सर्व प्रभागातील सर्व मोहल्यातील पिण्याच्या पाण्याची समांतर लाईन त्वरित टाकावी. (सद्यस्थितीत पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.,
जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागराच्या पायथ्याशी पैठण शहर असल्यामुळे पैठण शहराला पूर्वीप्रमाणे सकाळी व सायंकाळी, दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन तात्काळ करावे., पंप हाऊस वरील निकामी यंत्रे तात्काळ बदलावी. पंप हाऊस वरील सर्व यंत्रणा चांगल्या स्थितीत नियमित ठेवण्या ची दक्षता घ्यावी. नाथसागरातील पाणी पंप हाऊस ला भविष्यात कमी पडणार नाही अशी उपाययोजना करण्यात यावी., पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथ नगर जायकवाडी उत्तर येथील पंप हाऊसला पूर्वीप्रमाणे एक्सप्रेस विद्युत लाईन जोडण्याचे आश्वासन नाथ षष्ठी 2024 च्या बैठकीत संभाजीनगर जिल्हा विद्युत वितरण प्रशासनाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे., पंप हाऊस परिसरात त्वरित नवीन आवश्यक तेवढ्या पाणी साठणुक टाक्या बांधाव्यात., पैठण शहरातील ड्रेनेज पाणी साठविण्यासाठी प्रथम सांडपाणी साठणुक केंद्र उभारण्यापूर्वीच आश्चर्य तथा धक्कादायक बाब म्हणजे पैठण शहरातील ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले, यासाठी जवळपास 60 कोटीचा निधी खर्च झाला डे्ृनेज पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे लोटली तेव्हा उर्वरित काम त्वरित पूर्ण करण्यात यावे., गेल्या अनेक वर्षापासून पैठण शहरातील सर्व प्रभागातील व मोहल्यातील सांडपाणी नाल्या नियमित काढल्या गेलेल्या नाही त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरी जावे लागते याची सखोल चौकशी करण्यात येऊन प्रत्येक आठवड्याला सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नियमित काढण्यात याव्या व त्या संदर्भातील लोकांच्या सह्याचे रजिस्टर ठेवण्यात यावे., पैठण शहरातील सर्व प्रभागातील सर्व मोहल्यातील निकामी नाल्लांची बांधकामे व निकामी रोडची दुरुस्ती कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी., पैठण हे शहर प्राचीन ऐतिहासिक व तीर्थक्षेत्र असल्यामुळे स्थानिक लोकांच्या समस्या सुटलेल्या नसताना व त्या सोडविणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. “जुने गाव भकास नवीन गाव उदास” अशी अवस्था निर्माण होऊ नये म्हणून वरील बाबींची पूर्णतः अंमलबजावणी झाल्यानंतर व भविष्यात ही कायमस्वरूपी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही अशी हमी पैठण नगर परिषदेने लेखी स्वरूपात शासनाला सादर केल्याशिवाय पैठण हद्द वाढ प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये.
