दै चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड :- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेडकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नियोजन विभाग उपसचिव, दिव्यांग कल्याण विभाग सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि पोलीस महासंचालक यांना एक नुकतेच निवेदन सादर केले आहे या निवेदनात म्हटले आहे की, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून दिव्यांगांचा शासन निर्णयीत राखीव निधी खर्च व्हावा यासाठी गत अनेक वर्षांपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,नागरी स्वराज्य संस्थांकडे लोकशाही मार्गाने निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुन हा अखर्चित निधी खर्च करण्यास भाग पाडले आहे परंतु लोकप्रतिनिधी मात्र दिव्यांगांच्या बाबतीत उदासीन असल्याचे जाणवले आहे कारण यापुर्वी २०१६ पासुन लोकसभा सदस्यांनी देखील एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा विशेष तरतूद असलेला निधी खर्च न करता आपला कार्यकाळ संपविला आहे आणि या कार्यकाळात त्यांना मतदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांनाही प्रोत्साहित करून दिव्यांगांचे मतदान करून घेत अक्षरशः फसवणूक केली असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी म्हटले आहे. आता विधानसभा विसर्जित होऊन नव्याने विधानसभा निवडणुका होण्यासाठी काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे आणि नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदाराने आपल्या आमदार स्थानिक विकास या कार्यक्रमातील दिव्यांगांचा विशेष तरतूद करण्यात आलेला दरवर्षीचा महाराष्ट्र शासन नियोजन विभाग यांचा २०२३ च्या सुधारीत शासन निर्णयानुसार ३० लक्ष रूपये आणि पुर्वीचे दरवर्षीचे १५ लक्ष रूपये आजवर अखर्चितच आहेत असे साळवे म्हणाले.जिल्हा नियोजन विभाग नांदेडकडे यासंदर्भात सतत पाठपुरावा केला असता संबंधित अधिकारी हा निधी खर्च करणे न करणे हा आमदारांचा ऐच्छिक विषय असल्याचे म्हणत त्यांना आम्ही यासंदर्भात पत्र दिले असल्याचे म्हणत दिशाभूल करत असल्याचे साळवे म्हणाले. साळवे पुढे म्हणाले की दिववयांगांच्या हक्काचा राखीव निधी जर आमदार खर्च करत नसतील तर आमदार स्थानिक विकास निधीतून जी कामे झाली आहेत किंवा होत आहेत ती कामे खरंच उच्च दर्जाचे असतात का. बोगस कामे नसतात का आणि खरच विकास कामे झाली असती तर नांदेड जिल्हा हा देशात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला नसता का असे म्हणत साळवे यांनी टक्केवारीवर कामे चालत असल्याचे म्हटले आहे म्हणूनच दिव्यांगांचा निधी अखर्चित राहत आहे कारण यामध्ये टक्केवारी मिळत नसते असे साळवे म्हणाले त्यामुळे आमदारांनी आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधी दिव्यांगांचा विशेष निधी पुर्णतः खर्च करावा आणि जिल्हा प्रशासनाने हा निधी पुर्णतः खर्च करून घ्यावा अन्यथा आमदारांच्या घरावर आणि संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या घरावर तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर राहुल साळवे आणि संजय धुलधाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर आंदोलनात शेकडोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रदिप हनवते, मिलींद सितळे.शिवाजी सुर्यवंशी कार्तिक कुमार भरतीपुरम.शेख उमर, नागनाथ कामजळगे.कमलाकर टाकळीकर.पिंटु राजेगोरे.मसुद मुलाजी.शेख आरिफ.शेख सादिक.राजु इराबत्तीन.अब्दुल माजीद.व्यंकट कदम.अजय गोरे.शेख आतिक.हणमंतराव राऊत.शेख सिराज यासह भाग्यश्री नागेश्वर. सविता गवते. कल्पना सपते यांनी आज केले आहे.
