शहरभर लावण्यात आलेल्या पोस्ट पेट्या इतिहासात जमा
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): आजच्या डिजीटल युगात जुन्या पध्दतीने पोस्टकार्ड पाठवून ख्याली खुशाली विचारण्याचे दिवस आता गेले आहेत. त्याची जागा आता व्हिडिओ कॉलसह वेब कॅमेऱ्याने घेतली आहे. त्यामुळे पूर्वी शहरात लावण्यात येणाऱ्या पोस्ट विभागाच्या पेट्याही आता इतिहास जमा झाल्या आहेत.
इंटरनेटच्या युगात सर्व जग जवळ आले आहे. आज आपण घर बसल्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून थेट बोलू शकतो. पूर्वीपोस्टकार्ड, तार पाठवून एकमेकांशी संपर्क ठेवला जायाचा ते दिवस आता गेले आहेत. पूर्वी खाकी रंगाचे पंचविस पैशाला मिळणारे पोस्ट कार्ड आता कुठेतरी हरवले आहे.
आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन पोस्टकार्ड या पत्रांत असायचे. आता फेसबुक, व्हॉटसअॅपच्या जंजाळात हे सर्व काही हरवले आहे. नात्यात कोरडेपणा आला आहे. हा नात्यातील कोरडेपणाला कुठेतरी पाझर फुटून पुन्हा आठवणींच्या रूपात जिवंत व्हावा. यासाठी आज काळाची गरज निर्माण झाली आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात पत्रकोण पाठवले? मात्र, आजही भारतातील काही दुर्गम भागात अशा ठिकाणी पत्र हेच एकमेकांशी संपर्क करण्याचे साधन आहे. एक काळ असा होता. जेंव्हा लोक पत्राची आतुरतेने वाट पाहात असे. मात्र, बदलत्या काळाबरोबर आणि तंत्रज्ञाना बरोबर मोबाईल व सोशल मिडीया मुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो. पूर्वी अनेक ठिकाणी लाल रंगाच्या पोस्ट पेट्या मुख्य चौक, बसस्थानक, विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांच्या भागात असायच्या. मात्र, या पेट्याही आता गायब झाल्या आहेत.
