दैनिक चालू वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
======================
लातूर जिल्हा /अहमदपूर:-
तालुक्यातील मौंजे हाडोळती तालुका अहमदपूर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत चालणाऱ्या श्रीहरी प्राथमिक विद्यामंदिर, दयानंद विद्यालय व कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वा आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कौडगावे गणपत हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक बच्चेवार ,माजी प्राचार्य व्यंकटराव मुळके, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शेख एस .एम., डॉक्टर शिवप्रकाश निजवंते,डॉक्टर माधव गुट्टे, डॉक्टर संगमेश्वर हेगणे, डॉक्टर गोपाळ जाधव ,मुख्याध्यापक अर्जुन कानवटे, बालाजी कदम, पर्यवेक्षक सूर्यवंशी एम.डी., पर्यवैक्षक अशोक कोटसूळवार, आदी मान्यवर उपस्थित होते. दिनांक 21 जून 2024 रोजी श्रीहरी प्राथमिक विद्यामंदिर, दयानंद विद्यालय व कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयाच्या प्रांगणात 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने सकाळी ठीक 6.00 ते 8.00 या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी योगाचार्य श्री प्राध्यापक सोरगेकर के.आर. व योगाचार्य प्राध्यापक गोविंदराव शेळके व बालाजी कदम यांनी योगाचे उपस्थितांना महत्त्व सांगून योगासनाचे विविध प्रात्यक्षिके करून दाखवली या शिबिरात गावातील नागरिक, डॉक्टर ,शिक्षक ,पालक , विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वटपौर्णिमेच्या निमित्ताने संकुलाच्या प्रांगणात वडाच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.
