दै. चालु वार्ता
धुळे: तालुक्यातील ग्रामपंचायत नरव्हाळ येथील आज रोजी महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी विभागामार्फत लहान मुला मुलींना पौष्टिक आहार न देता अतिशय निकृष्ट दर्जेचे आहार वाटप करण्यात येत असून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यासाठी या गोष्टीचा विरोध म्हणून आज ग्रामपंचायत नरव्हाळ येथील ग्रामपंचायत सदस्य, सौ. हेमलता गोविंदा अहिरे यांनी संपूर्ण आहाराची चौकशी करून अंगणवाडी कर्मचारी यांना सांगितले की आपण कुठल्याही प्रकारचे आहाराचे किट लहान मुलांच्या पालकांना देऊ नये असे सांगण्यात आले व आलेला आहाराची किट शासनाला परत करावे असे देखील सांगण्यात आले..!तसेच अशा आहारामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे या आहार पुरवठ्याची चौकशी करुन हा भ्रष्टाचार थांबवावा अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.यावेळी लहान मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
