दैनिक चालु वार्ता चिपळूण प्रतिनिधी – स्वाती हडकर
दि हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल हर्णैचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे 💯 टक्के लागला असून इंटरमीडिएट ग्रेड परीक्षेचा निकाल 85 टक्के लागला आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत एकूण 11 विद्यार्थी पैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थिनी तहरीम इर्शाद महालदार , अक्सा अल्ताफ काझी *बी* ग्रेड ने उत्तीर्ण झाली आहे. तर इंटरमीडिएट परीक्षेत 27 विद्यार्थी पैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून त्यामध्ये सुद्धा
अलमनार इम्रान झोंबडकर ही विद्यार्थ्यांनी *बी* ग्रेडने उत्तीर्ण झाली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक मुबीन बामणे सर, मुख्याध्यापक असिफ भाटकर सर, मार्गदर्शक शिक्षक यांचे स्कूल कमिटी व संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले.
