दैनिक चालू वार्ता जिल्हा प्रतिनिधी -प्रताप नागरे
वाशिम
मालेगाव
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या राष्ट्रहितवादी विचारांनी प्रेरित होऊन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आज दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मालेगाव येथील विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेत भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
हा पक्षप्रवेश कार्यक्रम वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सचिव गजानन वैरागडे यांच्या सूचनेनुसार तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
मालेगाव–रिसोड जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत शेटे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांनी विद्यार्थी सेनेत अधिकृत प्रवेश केला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत मालेगाव–रिसोड जिल्हा उपाध्यक्ष अतिश डहाळे, मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, मालेगाव शहराध्यक्ष सुभाष गाभणे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, राजेश हिंगणे, शिरपूर शहराध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह योगेश लहुटे, वैभव शेटे, खुशाल कुंभार, तेजस गव्हाणे, राहुल वाघमारे, आदित्य वानखेडे, रितेश वानखेडे, भीमरत्न वानखेडे, प्रकाश गायकवाड, विशाल काळे, संतोष गायकवाड, संदेश सुरेश राठोड, विष्णू काळे, यश काळे, शुभम हिंगणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करत मनसेची भूमिका, विद्यार्थी सेनेचे ध्येय व संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे मालेगाव व परिसरात विद्यार्थी सेनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
