इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी येथील मविप्र संचलित कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना महिला करीता असलेल्या कायदेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड.आकाश अशोक खारके होते त्यांनी या प्रसंगी बोलताना महिलांसाठी असलेले महत्त्वाचे कायद्यांची माहिती देत कायद्याच्या चौकटीत राहून कसे न्याय अधिकार मिळविता येईल याचे मार्गदर्शन केले.” सायबर गुन्हे तसेच इतर सामाजिक गुन्हे घडणाऱ्या घटनेपासून त्रासदायक ठरत असलेल्या गोष्टी पासून कसा बचाव करता येईल याबद्दल असलेले कायदे समजावून देत पुढे अन्याय सहन न करता कायद्याच्या आधारे कसे त्या अन्यायाला प्रतिबंध लावता येईल हे पटवून देत, आसपासच्या लोकांना कायद्याविषयी जागृत करण्याचे आवाहन ॲड.आकाश खारके यांनी उपस्थित विद्यार्थीनींना केले..यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते ॲड.आकाश खारके यांचे सत्कार करण्यात आले..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे होते. त्यांनी आपल्या स्वानुभवातून विद्यार्थिनींना आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संधींची माहिती दिली. तसेच महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विष्णू राठोड यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अंबादास कापडी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बलराम कांबळे यांनी तर प्रा.ज्योती भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी उपप्राचार्य कन्हैया चौरेसिया होते. तसेच जिल्हा समन्वयक डॉ. राकेश पाटील व डॉ.तुषार पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अंबादास कापडी, कार्यक्रम समन्वयक डॉ.लीना देवरे, भाग्यश्री सोनार, अश्विनी बेहेरे, शोभा भोसले, श्वेता झनकर, सुनिता देसाई, अश्विनी गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांनी केले.
