दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा ६६ वा महपरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामराव भोसले, प्रमुख पाहुणे युवक काँग्रेस कार्यकर्ते दत्ता भोसले,मुकुंद कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुध्दाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्रिशरण पंचशील संतोष भोसले घेतले. यावेळी प्रतीक भोसले,अक्षय जावळे,कमलेश भोसले,सौरभ भोसले, सत्तू क्षीरसागर,सुरेश गायकवाड, सुमित भोसले, नितीन भंडारे,प्रभाकर गायकवाड, दादाहरी भोसले, अनिल गायकवाड, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेश गायकवाड यांनी केले तर आभार बापू भोसले यांनी मानले.
