दैनिक चालु वार्ता शहादा प्रतिनिधी-
तालुक्यातील जयनगर येथील श्री चक्रधर माध्यमिक आणि कै.त.मुक्ताबाई आंबेकर उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून विद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु.प्रतिभा राधेश्याम राठोड हिस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देन्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य श्री आय डी माळी व व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व जेष्ठ शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले ह्यांनी स्त्री उद्धारासाठी केलेल्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना तोंड ओडख व्हावी ह्या उद्देशाने विद्यालयीन सांस्कृतिक समितीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.सदर स्पर्धा दोन गटात विभागून घेण्यात आली .पाचवी ते आठवीच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंचे बालपण ह्या विषयावर तर नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्य ह्या विषयावर भाषणे दिली.लगेचच परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला असता पहिल्या गटातून कु पूर्वजा विलास सोनवणे ह्या विद्यार्थिनी ने प्रथम तर कु.प्रियंका भरत नगराळे द्वितीय आणि सतीश नाना भाऊ निकुंभे ह्याने त्रितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.तसेच दुसऱ्या गटातून कु माया रतीलाल राठोड हिने प्रथम तर पल्लवी राजेंद्र भिल हिने द्वितीय आणि त्रितीय क्रमांकाचे कु रुतिका रवींद्र साबळे हिने पटकावले. सर्व विजेत्या स्पर्धकांना श्री बी बी पाटील,श्री व्ही एम अडगाडे,श्री वाय ए पाटील ,श्री एस एस पाटील व श्री एस एस मोहिते आदी शिक्षकांच्या हस्ते गौरवण्यात आले.सर्व विजेत्याना पारितोषिके महात्मा फुले युवामंचचे संस्थापक अध्यक्ष श्री आय डी माळी ह्यांच्या कडून देण्यात आले होते. तसेच इयत्ता सातवीत शिकणाऱ्या पूजा धनराज गोसावी नामक विद्यार्थिनी ने सावित्रीबाई फुलेंचे नेत्रदीपक प्रतिमा काढून आपल्या कलेचा उत्तम नमुना सादर केला .श्री चतुर जी कुवर ह्यांच्या तर्फे ह्या मुलीला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापक श्री आय डी माळी ह्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात कु प्रतिभा राठोड ह्यांनी सर्व मुलाना सावित्रीबाई फुलेंचे कार्य विशेष नमूद केले.त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी गावातील सावित्रीबाई फुलें व महात्मा फुले ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सामूहिक रित्या अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री आय.डी.माळी , बी.बी.पाटील, वाय.ए.पाटील ,आर.बी.पाटील एस.एस.पाटील,
व्ही.एम.अडगाळे आदी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.एस.एस. मोहिते व श्री आर बी पाटील ह्यांनी केले
