दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी नांदेड- संभाजी गोसावी.
आपल्या घरामध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन होणार असल्यांने वातावरण अगदी आनंदीमय असते. पण अशाच आनंदाच्या भरात एक दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यांमधून समोर आली आहे.आपल्या लेकीला बाळंतपणासाठी माहेरी आणताना दुचाकी अपघातांमध्ये बाप-लेकीसह आणि गर्भातील बाळाचा जागीच मृत्यू झाला ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० (उदगीर-जांब रोडवर पाटोदा खुद्द) फाट्याजवळ ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये (बालाजी किसनराव राबवते वय ४० रा . सोमासवाडी ता.कंधार व राजश्री राजेश श्रीमंगले )अशी मृतांची नावे आहेत. याबाबत जळकोट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन कंधार तालुक्यांतील बालाजी रासवते हे दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी मुलीला म्हणजेच राजश्रीला बाळांतपणासाठी आणण्यासाठी उदगीरला गेले होते. रात्रीच्या वेळी मुलीला घेवुन परत येत असताना रात्री उशिरा पाटोदा खुद्द पाटीच्या शेजारी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वळणाच्या ठिकाणी दुचाकी वरील ताबा सुटल्यांने त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये दोघे बाप-लेकीच्या डोक्यांला व शरीरावर इतर ठिकाणी जबरदस्त मार लागला यात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाटोदा येथील एक युवक व्यायाम करण्यासाठी रस्त्यावरून जात असताना रस्त्यांच्या शेजारी दरीत एक दुचाकी तसेच एक पुरुष व महिला असल्यांचे निदर्शनांस आले त्यांनी तत्काळ जळकोट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनांसाठी जळकोट ग्रामीण रुग्णालयांत पाठविले. या दुर्दैवी घटनेमुळे सोमासवाडीसह परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे._*
