दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
महाराष्ट्र राज्य सरकार महाविज वितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याच्या विरोधात महाविज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी लाक्षणिक संपावर आहेत, या संपाला दि.४/१/२०२३ रोजी आंदोलन संपाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने परतुर तालुक्यातील महावीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, सोळंके पुढे म्हणाले की राज्य सरकारने कठोर खाजगीकरण करण्याचा निर्णय बदलला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशाराही सोळंके यांनी दिला ते पुढे म्हणाले खरंच महावीज वितरण कंपनीचे खाजगीकरण झाले तर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी संघर्ष समिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लोयीज फाउंडेशन भारतीय महिला फेडरेशन (ठाणे) समिती व कामगार एकता कमिटीने जाहीर केलेल्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून खाजगीकरण झाल्याने काय नुकसान होऊ शकते, महाराष्ट्रातील समांतर वीज वितरणाचे परवाने तसेच प्रस्तावित सुधारणा विधेयक २०२२ (EAB) मंजूर झाल्यास वीज क्षेत्राचे आणखी खाजगीकरण होईल म्हणून विपरीत परिणाम होईल अशा प्रकारचं मने संघर्ष समितीचे आहे संघर्ष समिती पुढे म्हणत आहे की वीज अधिक महाग होईल कोट्यावधी ग्राहक आणि दुर्गम भागातील लोक दुर्लक्षित होतील अन्नधान्याच्या किमती वाढतील कारण करोडो शेतकऱ्यांना अनुदानित २० मिळणे बंद होईल अनेक लोकांना फुगलेली विज बिल मिळतील जी आधी भरावे लागतील नाहीतर ते वीज खंडित करतील शेतकऱ्यांना लहान आणि दुर्गम भागातील ग्राहक आणि गरीब कष्टकरी लोकांना सार्वजनिक पाणीपुरवठा व दिवाबत्ती इत्यादी वीज ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी जबाबदारी फक्त डिस्कॉम्स सरकारी मालकीच्या वितरण कंपन्या उचलतील ज्यांना कंट्रकद्वारे निधीची आवश्यकता असेल लोकांच्या पैशाचा वापर करून विजेचे एक विशाल वितरण नेटवर्क तयार केले गेले आहे ज्याचा वापर आता मोठ्या कॉर्पोरेशना समृद्ध करण्यासाठी केला जाईल कोणतीही गुंतवणूक न करता खाजगी कंपन्या नफा कमवतील आणि मोठ्या खाजगी मक्तेदार कंपन्या निर्माण केल्या जातील नवीन कायद्यामध्ये वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता योग्य नियंत्रण नसल्यामुळे ग्राहकांना त्यासाठी न्यायालयात लढाई लढावी लागेल असे अनेक गंभीर प्रश्न वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण झाले तर जनतेला आहात गंभीर त्रास होईल शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे, म्हणून शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन परतुर येथे महावीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे पाठिंबाचे पत्र देण्यात आले पत्र देत असताना सोबत उपजिल्हाध्यक्ष रामजी नवल तालुका अध्यक्ष कृष्णा सोळंके शहराध्यक्ष सोपान काका गोरे बाबासाहेब साबळे मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
