दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने मतिमंद निवासी शाळा ,इंदापूर या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ, फळे व पाणी बॉटल वाटप करून साजरी करण्यात आली. यावेळी मातंग एकता आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस भगवान मोरे सर म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य फार मोठे असून स्त्री उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य संपूर्ण भारताच्या कायम स्मरणात कायम राहील.
अज्ञान हा माणसाचा शत्रू त्याला दूर करण्यासाठी, स्त्री- पुरुष भेद दूर करण्यासाठी, जातीभेद मिटविण्यासाठी महात्मा फुले यांनी जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. या शाळेत शिक्षिका म्हणून व मुख्यध्यापिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या बुद्धिमान,विद्वान असणाऱ्या सावित्रीबाईच्या वाचनाचे, लेखनाचे पडसाद त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून दिसू लागले.
“स्त्री शिक्षणाइतकेच महत्त्वाचे कार्य दीन, दलित, दुबळे
यांचा उध्दार करणे, विकास करणे हे होते. आपल्या पतीच्या साथीने दलितोद्धाराचे रणशिंग फुंकले. समाजातील जातीभेद दूर झाला पाहिजे, भेदभाव नष्ट केला पाहिजे यासाठी जनजागरण केले. स्त्रीमुक्ती आणि दलितोद्धाराचे कार्य करणारी संत म्हणजे आधुनिक युगाची, युगप्रवर्तक क्रांतिज्योति सावितीबाई फुले .
आज महिला स्वयंपाक घरापासून ते संसदेपर्यंत, सायकल रिक्षा चालविण्यापासून ते अंतराळयानापर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईच्या लेखणीमुळेच झाली आणि आता ही प्रगती कधीच थांबणार नाही, सावित्रीबाईंचे बोट सोडणार नाही. मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रमेश दादा बागवे साहेब व कार्याध्यक्ष आदरणीय अविनाश दादा बागवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून या महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला नेहमीच अभिवादन करत राहील.
यावेळी विमुक्त भटक्या जाती- जमातीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तानाजीराव धोत्रे, राज्य मराठी पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव बोराटे, जेष्ठ पत्रकार शिवाजी आप्पा पवार, युवा नेते पप्पू शेठ पवार, लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप, युवानेते साजन ढावरे, मातंग आंदोलन संघटनेचे युवा नेते अमोल कांबळे, संपर्कप्रमुख अमित मोरे, पत्रकार अतुल सोनकांबळे, आनंद खंडागळे, नानासाहेब मोरे, भगवान आरडे, अशोक मोरे, हनुमंत मोरे , दत्ता भाऊ मोरे,रांझणी,अवसरी, भाटनिमगाव, बाभुळगाव आणि इंदापूर येथील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
