दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
बनकरवाडी येथील महात्मा फुले ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संत शिरोमणी सावता माळी मंदिर बनकरवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी बनकरवाडी येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्ताई बल्ड बॅंक इंदापूर यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.यावेळी बनकरवाडी व आसपासच्या परिसरातील अनेक तरुण रक्तदान करण्यासाठी हजर होते.
या शिबिरामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले ग्रुप बनकरवाडी यांच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात आले.
