दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..तालुक्यातील किर्ला येथे क्षुल्लक कारणांवरून युवकास मारहाण करण्याची घटना सोमवार 2 रोजी घडली
सविस्तर असे की एदलापूर (परतूर) सध्या मंठा येथील शेतकरी भारत नामदेव जाधव (फिर्यादी) हा पत्नी सह शेताकडे जात असतांना वाटेत कर्णावळ येथील आरोपी कृष्णा सखाराम राठोड ,याने कांदा बियांचे पैसे मागितले असता एक महिन्याने देतो म्हणाला दोघात शाब्दिक भांडण होऊन वाद वाढला त्यावर कृष्णा याने मारहाण सुरू केली त्याच्या मदतीला भाऊ ज्ञानेश्वर व पत्नी सुनीता कृष्णा येऊन तिघांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद भारत जाधव याने दिल्यावरून मंठा पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्यात आला पो नि संजय देशमुख यांचे मार्गदर्शनानुसार तपास पो उप नि बी पी राऊत यांचे कडे सोपविण्यात आला आहे
