दैनिक चालु वार्ता रायगड म्हसळा प्रतिनीधी- अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा या शाळेचे विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा 2022-23 सहभाग घेऊन 100% निकाल मिळवला व सोबतच इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा 2022-23 यात हि 100% निकाल देऊन शाळेच्या यशात एक मानाचा तुरारोवला शासकीय चित्रकला विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला या प्रकारात शाळेचे एकूण 58 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात ” ए ” ग्रेड मध्ये कु. येलवे जागृती रवींद्र या विद्यार्थिनीने यश मिळविले आहे. व ” बी “ग्रेड मध्ये विदयार्थ्याने यश मिळवून शाळेचे नाव उंचाविले तर एलिमेंटरी ग्रेड या प्रकारात ” ए ” ग्रेड कु. आर्यन चंद्रकांत कामडी, पवार धनश्री महेश, आंजर्लेकर संसकार उमेश, खतातेव ईश्वरी संजय, नाकती वेदिका दिनेश, इंगोले राणी लक्ष्मण व बी ग्रेड मध्ये इतर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून 100% निकाल राखत शाळेचे नाव उंचाविले त्या बद्दल शाळेचे प्राचार्य श्री प्रकाश हाके यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आणि या यशात सर्वात मोठावाटा असलेले मार्गदर्शक, कला शिक्षक श्री सुनील तुकाराम बंडगर सर यांनी घेतलेल्या परिश्रमाची पोचपावती म्हणून त्यांचेही कौतुक व अभिनंदन करण्यात आले. श्री बंडगर सर यांची कला एक प्रकारची जादूच असून त्यांनी रेखाटलेले चित्र हे बोलके असतात जणू आपण बघत असताना ते हि आपल्याला जणू डोळ्यात डोळे घालून पहात आहेत असे वाटते. या पर्यवेक्षक श्री नेताजी गायकवाड,
