दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी –
येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर च्या शाळेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी यौथ्दा आणि हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त कार्यक्रमआयोजितकरण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर चे मुख्याध्यापक भारत कलवले सर हे होते. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक एन.पी.केंद्रे सर, अरविंद केंद्रे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.सुंदाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एस. खवास पाटील यांनी केले तर आभार कु.संगीता वडजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक , एच.आर.चव्हाण,ए.व्ही.रामगिरवार,एम. एन.गुंटूरकर,एस.पी.डांगे, अरविंद केंद्रे,पी.एम. नितीन रानशेवार,चंद्रमणी सोनकांबळे ,शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षणार्थी. मुळेकर, सुचिता जाधव, इरम सबा रफिक, सुजाता कांबळे,सुचिता जोगदंड, भाग्यश्री जाधव आदींनी परिश्रम घेतले…
———————————————–
