दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर बल्लारशाह येथे आज दिनांक 23/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने एक यशस्वी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत प्रभारी मोतीलाल चौधरी यांनी संघटनेचे महत्व समजावून सांगितले, आणि संस्थेचे नवे आयाम कोणत्या समाजात प्रत्येक हिंदूला कार्यात कसे सहभागी करून घेता येईल याची सविस्तर माहिती दिली. आणि श्री.अजय भोजेकर यांची बल्लारशाह विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर श्री.नंदूजी गट्टूवार ( पूर्व विदर्भ प्रभारी विभाग अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रमुख संघाची उपस्थिती ज्यामध्ये श्री.अभिजीत स्वान ( चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री), श्री.सुयोग खटी (राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष), श्री. हरीश मोटवानी (जिल्हा संपर्क प्रमुख) चेतन व्यास (शहर अध्यक्ष) आदी, नागपूर येथील श्री.विजय धनजोडे व मोठ्या संख्येने नागरिक व संघटनेचे पदाधिकारी मंचासमोर उपस्थित होते.
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
