दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महागाई आणि बेरोजगारी हे दोन विषय एवढे महत्वपूर्ण आहेत. ज्यामुळे भाजपा पूर्णपणे घाबरलेली आहे. किंबहुना सरकार संसदेमध्ये त्यासाठीच या विषयांवर कांहीच बोलता अगदी मौन पाळून आहे. भाजपा अशा महत्वाच्या मुद्यांना केवळ नजर अंदाज करुन भारतीय जनतेत धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्या फौजिया खान यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित जनजागरण यात्रेला संबोधित करताना त्या पुढे असेही म्हणाल्या की, संसदेमध्ये किंवा सभागृहाबाहेरही सरकार तर नाहीच परंतु भाजपाचा सदस्य किंवा नेते सुध्दा या विषयांवर बोलून हिम्मत दाखवायला तयार नाहीत तथापि लोकाभिमुख अशा विषयांना बगल देत सरकार लोकांना जाणिवपूर्वक बूमरॅंग (लक्ष दुसरीकडेच डायव्हर्ट) करीत असल्याचे फौजिया खान यांनी सांगून भाजपा व केंद्र सरकार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
दरम्यान खा.फौजिया खान यांच्या या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ उडाली जाणे स्वाभाविक आहे. केंद्रातील भाजपा सरकार सुध्दा नक्कीच या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देईल असा सूर खासगीत बोलताना आढळून आल्यास नवल ते कसले ?
