दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी :- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी: परमपूजनीय गोळवलकर गुरूजी प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दमन देगावकर, प्रमुख वक्ते सचिन जाधव तसेच प्र.उपस्थितीत शालेय समिती सदस्य मा. भागवतजी तम्मेवार, मा. अनुपजी कोटगीरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करण्यात आली.यानंतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले.आजचे प्र.वक्ते अभ्यासक्रम मंडळ प्रमुख जाधव सचिन यांनी आपल्या भाषणात देशाविषयी, समाजाविषयी, आणि हस्ताक्षर याविषयी अभिमान बाळगला पाहिजे तसेच जयहिंद चा नारा राष्ट्रीय नारा म्हणून घोषित करण्यात आले हे सांगीतले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेले देशकार्य, आझाद हिंद सेनेची स्थापना, त्यांच्या जिवनातील ऐतिहासिक प्रसंग या विषयावर माहिती सांगीतली.. क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनुपजी कोडगिरे म्हणाले की, खेळामुळे शरीर तंदुरुस्त रहाते. अभ्यासाबरोबर मैदानी खेळ खेळला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात देगावकर दमन यांनी खेळण्यातून शारीरिक व मानसिक विकास होतो.खेळासाठी एक तास आपल्या नियोजनात असावे.असे सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचारे रूपा यांनी केले पद्य कु.बोडके जिज्ञासा हिने सादर केले.आभार अश्विनी कदम, सूत्रसंचालन.सुरशेटवार यांनी केले. सहकार्याच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाला.
