दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-शहरातील जैन बांधवांच्या वतीने आज महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिर येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष ,महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. भगवान महावीरांच्या उपदेशाप्रमाणे ही मिरवणूक अत्यंत साधी व शिस्त पूर्ण होती. या मिरवणुकीत सुनीलकुमार डुंगरवाल, शितलभाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीपकुमार आहेरकर, डॉ शांतीनाथ अंबुरे, शिरीष नहार, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, सुदीप महाजन, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजयकुमार सुरपुरिया,आदिं जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
