तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व केंद्र सरकार ला निवेदन…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना,मंठा:- शहरात जागतीक आदिवासी दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातुन मणिपुर येथे अदिवासी महिलांची विवस्त्र करुन धिंड काढणारे नराधमाना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपुर्वक मणिपुर हिंसेला खतपाणी घातल्याचा आरोप करीत आदिवासी विकास परिषदेच्या वतिने रॅली काढून निषेध करण्यात आले
( ता.०९ ) रोजी तहसिलदार यांच्या मार्फत मा.मामहिम राष्ट्रपति व केंद्र सरकारला मणिपुर मधील पिडितांच पुर्णवसन करून आरोपींना तात्काळ अटक करावे अश्या अश्याचे निवेदन देण्यात आले.
पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मणिपुर मानसिक हिंसेने होरपळत आहे, तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक या हिंसेला खतपाणी घातले आहे, याचा आम्ही निषेध करतो, या हिंसाचारात विरोधी गटाला धडा शिकवण्यासाठी आदिवासी समुहातील स्त्रियांवर लैंगिक आत्याचार करण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे. अलिकडे एका व्हिडिओ क्लिपद्वारे उघडकीस आलेले आदिवासी स्त्रीयांची नग्न धिंड आणि त्याची शारीरीक विटंबनेची क्रुर व आमानुष घटना मानवाला कलंक आहे. या घटनेचा तसेच स्त्रीयांवरील अशा सर्व (ओ.एन ) विभाग आम्ही तीव्र धिक्कार करतो.
केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन मणिपुर मधील हिंसाचार ताबडतोब काबुत आणला पाहिजे, या हिंसाचाराचे भक्ष्य झालेल्या पिडितांना आवश्यक ते सहाय्य आणि त्याचे योग्य ते पुनर्वसन केले पाहिजे.असे या निवेदनात नमुद करण्यात आले.या निवेदनावर
अ भा आदिवासी विकास परिषद, जालना जिल्हा अध्यक्ष रामेश्वर फासाटे,रामकिशन रिठाड (उपाध्यक्ष),
जि.डि. जुंबडे (उपाध्यक्ष) आदिंच्या सह्या आहेत.
विविध सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा…
जमेअत उलेमा हिंद मंठा,
वंचित बहुजन आघाडी,
मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन,
ऑल इंडिया पेंथर सेना,
जय भीम सेना,
असंगठित कामगार व कर्मचारी कांग्रेस,
भारतीय असमिति पार्टी यूथ विंग ( BAP), अश्या विविध सामाजिक संघटनांनी या निषेध रॅलीस जाहिर पाठिंबा दिला.
