चुकतोय बळीराजाच्या काळजाचा ठोका,आम्ही जगायचं कसं…? आर्त हाक
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा.दवणे…
जालना (मंठा):- यंदा सरासरीपेक्षा १०३ टक्के पाऊस पडणार मान्सून लवकरच केरळ किनारपट्टीवर धडकणार असा हवामान खात्याने बाण सोडला, पण जून महिना गेला जुलै उलटला ऑगस्ट अर्धा तरी अद्याप ठोक पाऊस ना मान्सुन चा पत्ता आहे ना वळवाचा,!
बळीराजा पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून हवामान खात्याच्या भरवश्यावर अल्पशा पावसावर पेरण्या केल्या रिमझिम पावसावर पिक तग धरून आहेत ठोक पाऊस नसल्याने पिकावर रोगराई तन वाढत आहे कीटक नाशक फवारणी खुरपनी, खत यावर खिशात होत तेवढे भांडवलं लावून बळीराजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.तालुक्यात सिंचनाची कमतरता पाऊस कमी झाल्याने विहिरी कोरड्या पिके वाचणार कशी ही चिंता शेकऱ्यांना वाटू लागली आहे.सोयाबीनच्या पिकाने माना टाकल्या कपाशीची वाढ खुंटली वहीरी, ओढेनाले कोरडी उभे वारे, फुगारे,उन्हाचे चटके,पळणारे काळेकुट्ट ढग पाहून त्याची नजर क्षीण होत चालली आहे. पण पावसाचा अद्याप पत्ता नाही. कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्यामुळे पाऊस लांबतोय. मात्र आठवडाभरात गोवा, कोकणमार्गे महाराष्ट्रात पावसाचे आगमन होईल, विदर्भात येईल मराठवाड्यात जाईल असे हवेत गोळीबार करणारे नवे ‘हवा बाण’ हवामान खात्याने सोडले आहेत. त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसली तरी दुष्काळातील कृत्रिम पावसाप्रमाणे या नव्या अंदाजावर ‘कृत्रिम विश्वास तरी ठेवावा काय ? असा प्रश्न सर्वसामान्य करू लागले आहेत. दरवर्षी हवामान खात्याचे हवेत बाण सुटत आहेत त्यामुळे हवामानखात्याच्या भरवशावर राहिलेल्या बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकून त्याचे पुरते वेळापत्रक कोलमडत आहे. हवामान खात्यावर काही तरी अंकुश आहे की नाही असा संतप्त सवाल बळीराजा करत आहे.
इकडे सत्ता सुंदरीच्या खुर्चीच्या इशाऱ्यावर नेते मंडळी मश्गुल आहेत. त्यात झालेल्या निधी वाटपात कही ख़ुशी कही गम आहे तर काही मंत्रीमंडळ विस्ताराची वाटबघून मंत्रिपद भेटेल म्हनुन गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
