दै.चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
ॲड.किरण भालेकर व ॲड. प्रदीप दहीवाळ यांनी मांडली बाजू…
अंबाजोगाई येथील कलम 394, 504 सह 34 भारतीय दंड संहिता 1860 तसेच कलम 4/25 भारतीय शास्त्रास्त्र कायदा 1860 मधील आरोपींची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अंबाजोगाई यांचे न्यायालयाने सशर्त जामीनावर सुटका केली. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा नोंदणी क्र. 160/2023 मधील आरोपीची अंबाजोगाई येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयाने आरोपी यांची सशर्त जामीनावर सुटका केली. आरोपीचे शिक्षण, पूर्वी नसलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब हे कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरून व सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन सदरील आदेश करण्यात आले. आरोपीच्या वतीने अंबाजोगाई येथील विधीज्ञ प्रदीप पुरुषोत्तम दहिवाळ व विधीज्ञ किरण पांडुरंग भालेकर यांनी बाजु मांडली.
