दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई जिल्हा कधी केला जाणार…?
सध्या जिल्ह्याचे भौगोलिक अंतर पाहता जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकाला जिल्हा मुख्यालयाला कामानिमित्त जाण्यासाठी किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची मोठी गैरसोय होत असून ही बाब प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रतिनिधींनी शासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे.
महाराष्ट्रातील प्रस्तावित 22 जिल्ह्याची यादी
भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा देखील केली होती. दरम्यान महाराष्ट्र दिनापासून राज्यात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार अशा चर्चा वेगाने दिल्या जात आहेत होत आहे. दरम्यान, आज आपण महाराष्ट्रात कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खालीलप्रमाणे अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जी निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे. आहे. सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे. नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे.
निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहेतच,
याशिवाय गेली कित्येक वर्षे अंबाजोगाई जिल्हा करावा यासाठी लेखी निवेदने, आंदोलने बरीच झाले व जिल्हा निर्मितीसाठी जेवढ्या बाबी आवश्यक आहेत तेवढ्या बाबी अंबाजोगाईत आहेतच जसं की जिल्हा सत्र न्यायालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, MH44 आरटीओ ऑफिस, आशिया खंडात नावाजलेला ग्रा. वैद्यकीय दवाखाना यामुळे पुढील काही दिवसात जिल्हा व्हायला वेळ लागणार नाही असे चित्र दिसत आहे.
बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाईल का…?
याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे…
पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. विशेष बाब म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी केली आहे. इतरही आमदारांच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
याशिवाय रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा
लातूर मधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
जळगावमधून भुसावळ अन बुलढाणामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
