दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड(देगलूर); दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी आधारित प्रकल्पांतर्गत शेती कार्यशाळा दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी हणेगाव येथे शेती शाळा आयोजित करण्यात आली.
सदरील प्रकल्प हा शंभर हेक्टर शेतावर राबविण्यात आला असून प्रकल्पांतर्गत पिकाच्या अवस्थेच्या वेगवेगळ्या वाढीच्या होणारे बदल वाढीनुसार व वातावरणानुसार येणाऱ्या किडी व रोग आणि यामुळे किडी व रोगावर वेळीच नियंत्रण आणून यासाठी प्रयत्न करणे कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती सांगणे हे शेती शाळेचा मुख्य हेतू आहे त्यासाठीपिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्याअवस्थेमध्ये शेतकऱ्याचे शेती शाळा वर्ग आयोजित करण्यात येत असतात त्याच उद्देशाने हणेगाव येथे आयोजन करून कृषी सहाय्य्क धनासुरे एन आर यांनी प्रकल्पात निवडलेल्या शेतकऱ्याचे पायाभूत सर्वेक्षण गट निर्मिती आणि शेतकरी उत्पादक कंपनीतून संघाची स्थापना करणे आणि त्याचे फायदे यावर सविस्तर माहिती देऊन चर्चा घडवून आणली या विभागाचे तालुका कृषी अधिकारी टोणे आर. पी., धनासुरे एन.आर., जाधव लक्ष्मण, मारकवाड व्ही टी. विवेक पडकंठवार, रघुनाथ मदने, विलास भंडारे, विश्वनाथ मदने, टप्पेवाले चांद सेठ, यादव टोके, अमरीश भडारे संजय हंदीखेरे, आदी जण उपस्थित होते.
