परवा येथे फळबाग पालेभाज्यासह आधुनिक शेतीचे उत्कृष्ट नियोजन
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – पारवा येथील व परिसरात नावलौकिक असलेले शेतकरी बळीराम पा कऱ्हाळे जेमतेम पाचवी पासचे शिक्षण पुर्ण करून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शेतीकडे वळले एवढेच नव्हे तर आजही ते पारंपरिक पध्दतीने शेती करतात शेतीमध्ये खरीपाची पिके , रब्बीची पिके , फळबाग व पालेभाज्याचा पण समावेश आहे.
पारवा ते पिंपळगाव रोडवर असणारी बळीराम पा कऱ्हाळे यांची शेती आवर्जुन परीसरातील शेतकरी बांधव पाहण्यासाठी जातत व शेतीतील व्यवस्थापन सुक्ष्म स्वरुपाने निरीक्षण करतात एवढेच नव्हे तर दरवर्षी बळीराम कऱ्हाळे आपल्या शेतीमध्ये खरीपाची पिके , सोयाबीन , कापूस, मुग, उडीद , तुर , सह रब्बीची पिके गहु हरभरा , ज्वारी, अशी पिके योग्य प्रकारे व्यवस्थापन करून घेतत व त्यामध्ये उत्पादन ही भरघोस काढतात त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्याकडे शेतीचे व्यवस्थापन व मार्गदर्शन घेण्यासाठी येतत.
बागायतीमध्ये चिकु , सिताफळ , केशर आंबा , यामध्ये नुसतीच बागयत न करता वर्षीकाठी त्यामध्ये पालेभाज्या कारले ,टोमॅटो , मिरची, पालक , मेथी , सह अन्य पालेभाज्या या बागयती शेतीमध्ये लावण्यात आलेल्या रिकाम्या जागेत घेतात त्यामुळे परीसरातील सर्वच व्यक्तींना त्यांच्या शेतीतील उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट उत्पादन व पारंपरिक शेती करण्याची पध्दत आवडत असल्याने परीसरातील शेतकरी त्यांना शेती व्यवसायातील मॅनेजमेंट गुरु असे पण म्हणतात सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शेती व्यवसाय सांभाळत ते जोड व्यवसायात पण पारंगत आहेत.
बळीराम पा कऱ्हाळे यांनी आपल्या तीन मुलांना टेक्निकल शिक्षण देऊन नोकरीच्या मागे न धावता व्यापार व्यवसायासह शेती व्यवसायात पण अग्रेसर केलेले आहे त्यामध्ये एक मुलगा गावांमध्ये शेती व्यवसायासाठी लागणारे पुरक साहित्य हार्डवेअर व मशिनरीचा व्यवसाय चालवतो तर दुसरा मुलगा गावातच ऑनलाईन सेंटर सह मोबाईल रिपेरींग सेंटर चालवतो , आणी तिसरा मुलगा शेती व्यवसायाचे व्यवस्थापन करत आधुनिक शेती सांभाळतो.
पाचवी पास असलेला शेतकरी आपल्या मुलांना टेक्निकल शिक्षण देऊन शेतीपुरक व्यवसायासाठी मार्गदर्शन करून फळबागेसह पालेभाज्याच पण व्यवस्थित व्यवस्थापन करून शिक्षण देत यशस्वीपणे एक उत्कृष्ट उद्योजक बनवु शकतो , तर आपण आपले पाल्य बेघर होऊ द्यायचे नाहीत यासाठी अनेक शेतकरी बांधवांसह उद्योजक पण पारवा येथील पारंपरिक शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी बळीराम पाटील कऱ्हाळे यांच्याकडे आचही मार्गदर्शनासाठी येत आहेत.
पारवा येथील शेतीमध्ये आजही कांद्याचे नैसर्गिकरीत्या तयार केले रोप नेण्यासाठी शेतकऱ्यांचा कौल प्रचंड प्रमाणात असुन अनेक रोप ते स्वता तयार करतात , उन्हाळ्यात केशर आंबा परीसरात प्रसिद्ध आहे. जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी आशा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांची दखल घ्यावी व शेतीसाठी कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य करावे अशी परिस्थितील शेतकऱ्यांची मागणी आहे.
लोहा तालुक्यातील पांगरी येथील लोकप्रिय व आदर्श असणारं व्यक्तीमत्व तथा माजी सरपंच सुदाम पाटील बुद्रुक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पा बुद्रुक हिराकांत बुद्रुक , उद्धव पाटील बुद्रुक , जगन्नाथ पाटील बुद्रुक सह आदींनी या शेतीला भेट दिली व पाचवी पास असलेल्या पण शेतीसह जोड व्यवसायाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या बळीराम पाटील कऱ्हाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत शेतीची पहाणी केली. व पारंपरिक शेती फळबाग , पालेभाज्या सह उत्पन्न वाढ याविषयीचे सखोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी जाणुन घेतले.
