केंद्राचे पैसे आले खात्यावर : राज्याच्या निधीसाठी प्रतीक्षा…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा.दवणे..
जालना (मंठा)केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.त्याचं केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली. शासन निर्णय पारित करण्यात आला; मात्र केंद्राचा निधी अनेकांच्या खात्यावर जमा झालेला असताना राज्याचा निधी अजूनही जमा झालेला नाही. राज्य सरकारचा लाभ केव्हा मिळणार, यांची विचारणा मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे
मंत्रिमंडळाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. सदर योजनेंतर्गत केंद्र प्रमाणे तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पीएम सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी हे राज्य शासनाच्या योजनेसाठी पात्र असतील, असेही घोषित करण्यात आले; अद्यापही राज्य सरकारचा पहिला हप्ता शेतकऱ्यांवर खात्यावर जमा झालेला नाही. जुलै महिना संपला आणि ऑगस्ट महिना सरत आला आहे; परंतु राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. सध्या खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत. अनेकांना पैशाची अडचण भासत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असती, तर .शेतकऱ्यांना शेती कामासाठी उपयोगी पडली असती, असेही तालुकयातील् शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. केंद्राचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मागील महिन्यात२८ जुलैला जमा झाल्यामुळे राज्य सरकारचा हप्ता का जमा झालेला नाही, असा प्रश्न आता मंठा तालुक्यातिल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
फवारणीचा खर्च भागला असता…
सध्या शेती कामाचा हंगाम जोरात चालू आहे केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु, राज्याचा निधी अजूनही जमा झालेला नाही. राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेच्या अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असती तर यंदाच्या खरीप हंगामातील फवारणीचा खर्च या रकमेतून भागविता आला असता.
– कैलास सरकटे, शेतकरी वझर स.
