आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या सूचना…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : जिल्हा परिषदेव्दारे दरवर्षी वृक्ष रोपण व संवर्धनाकरीता ‘एक विद्यार्थी,एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात येतात.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात,शाळेच्या आवारात किंवा मोकळया जागेवर वृक्ष लावावे.याकरीता शिक्षक,मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे,असे सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आढावा बैठकीत दिल्या.
‘एक विद्यार्थी,एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या सोबत आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रफुल्ल कचवे,शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे,विस्तार अधिकारी,सर्व गटशिक्षणाधिकारी,समाजसेवक ए. एस.नाथन आदी उपस्थित होते.
‘एक विद्यार्थी,एक वृक्ष’ हा उपक्रम दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येते.या उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक,वर्ग शिक्षकांनी वृक्ष रोपण व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन जनजागृती करावी.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या परिसरात,शाळेच्या आवारात किंवा गावातील मोकळ्या जागेवर वृक्ष रोपण करावे.यासाठी शाळा महाविद्यालयस्तरावर वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिले.
