श्री.अण्णासाहेब संदिपान बिचुकले यांना जाहीर…
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – रायगड जिल्हा परिषदे कडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2023- 24 प्राप्त शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये म्हसळा तालुक्यातून श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले विषय शिक्षक रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती खारगाव बुद्रुक या समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत नाक्ती, उपाध्यक्ष सौ. राजश्री भायदे व सर्व सदस्य, पालकवर्ग, शिक्षक वृंद तसेच माननीय सरपंच श्री अनंतजी नाक्ती साहेब, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत खारगाव बुद्रुक यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
