दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):महाराष्ट्र राज्याचे मां मंत्री सोलापूर जिल्ह्याचे मा पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तात्रय भरणे यांनी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांची राष्ट्रवादी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मा राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या तसेच इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी संतोष राजगुरू यांची ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली म्हणून फेटा बांधून सत्कार केला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा संचालक विजयराव हेगडे, राष्ट्रवादी इंदापूर तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब भोंग,युवक नेतृत्व ऍडव्होकेट सचिन राऊत, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे मा संचालक कोंडीबा भोंग, मुंबई हायकोर्टाचे वकील एडवोकेट नितीन राजगुरू, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, सावता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, युवक आघाडी अध्यक्ष अमर बोराटे, तालुका कार्याध्यक्ष विष्णू झगडे, तालुका संघटक सुहास बोराटे, इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, शेंडे जी पाटील,पिटकेश्वर गावचे मा सरपंच विष्णू झगडे, मा उपसरपंच अंकुश मस्के, भोंग साहेब, महादेव शेंडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
