ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर,ऑल आऊटचा धोका..?
मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरूवातीपासून धुवाधार फलंदाजी करायला सूरूवात केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 200च्या पार पोहोचली.एक वेळ अस वाटत होतं ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या करून विकेट हातात ठेवेल.
मात्र बुमराहने ऑस्ट्रेलियाला या प्लान यशस्वी होऊ दिला नाही आहे. आणि त्याने एका मागोमाग एक ऑस्ट्रेलियाचे खेळाडू तंबुत पाठवले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया चांगलीच बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे आता भारतच आता ऑस्ट्रेलियाला किती धावात ऑल आऊट करत ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस उतरली होती. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उस्मान ख्वाजा आणि नवखा सॅम कोन्सटासन मैदानात उतरला होता. सॅम कोन्सटासन नवखा असून सुद्धा त्याने ऑस्ट्रेलियाला चांगली सूरूवात करून दिली होती. ही सलामी जोडी तोडण्यास बुमराह आणि सिराजला अपयश आलं होतं. त्यानंतर रोहितन जडेजाच्या हातात बॉल दिल्यानंतर त्याने सॅमला 60 धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा या दोघांची चांलगी पार्टनरशीप होत असताना बुमराहने ती मोडून काढली. बुमराहने ख्वाजाला 57 धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नस लाबुशेनला वॉशिग्टंन सुदररीत्या आऊट केले.
टीम इंडियाची डोकेदुखी ठरणारा ट्रेव्हिस हेड मैदानात उतरला होता, त्याच्या जोडीला स्टीव्ह स्मिथ आहे. या दोघांची जोडी पाहता ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या गाठेल अशी आशा होती. मात्र बुमराहने हेडला शुन्यावर बाद केले. हेडला बाद केल्यानंतर पुन्हा ओव्हर टाकायला आलेल्या बुमराहने मार्शला 4 धावांवर पव्हेलियन रस्ता दाखवला.अशाप्रकारे बुमराह ऑस्ट्रेलियाला एका मागून एक झटके देऊन बॅकफूटवर ढकळले आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आता 300 धावा करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर भारताला आणखीण 5 विकेटसची आवश्यकता आहे.त्यामुळे आता टीम इंडिया ऑस्टेलियाला किती धावात रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
