वोडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. अलीकडेच प्रीपेड प्लॅनमध्ये काही नवीन बदल केले आहेत. लोकांच्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे हा या बदलांचा उद्देश आहे.
महत्त्वाचं म्हणजे, Vi ने नवीन ‘SuperHero Packs’ आणि ‘Hero Packs’ लाँच केले आहेत, ज्यामध्ये यूझर्सना अधिक डेटा आणि दीर्घ व्हॅलिडिटी मिळते. Vi च्या नवीन प्लॅनविषयी जाणून घेऊया.
Vi SuperHero Plans
Vi ने नवीन ‘Superhero Packs’ लॉन्च केले आहेत, जे विशेषतः जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा मिळेल. याशिवाय, विशेष ऑफर अंतर्गत, तुम्हाला अर्धा दिवस (मध्यरात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत) अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळेल.
Vi SuperHero प्लॅनची किंमत 365 रुपयांपासून सुरू होते. या रिचार्ज प्लॅनमध्ये 365 रुपये, 379 रुपये, 407 रुपये, 449 रुपये, 539 रुपये 649 रुपये असे अनेक ऑप्शन समाविष्ट आहेत. हे प्लॅन खास तरुणांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत आणि त्या महिलांसाठी देखील फायदेशीर आहेत, ज्या सकाळी जास्त डेटा वापरतात.
Vi Hero Unlimited Plans
Vi च्या Hero Unlimited प्लॅनमध्ये अजून कोणताही मोठा बदल झालेला नाही. या प्लॅन्समध्ये यूजर्सना रात्री अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये 349 रुपये, 579 रुपये, 666 रुपये, 799 रुपये सारख्या ऑप्शनचा समावेश आहे. यापैकी काही प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे आणि 5G डेटाची सुविधा देखील आहे.
128 रुपयांचा Vi प्रीपेड प्लॅन
Vi ने 128 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन देखील लॉन्च केला आहे. हा एक परवडणारा प्लॅन आहे, ज्यामध्ये यूझर्सना 18 दिवसांची व्हॅलिडिटी, 10 लोकल नाईट मिनट्स (रात्री 11 ते सकाळी 6) आणि 100MB डेटा मिळतो.
1112 रुपयांचा Vi प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन (नवीन ब्रॉडबँड कनेक्शनसाठी) Vi One पोर्टफोलिओचा भाग आहे. हे Vi One फायबर प्लॅनसह खरेदी केले जाऊ शकते. 1112 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी, डेली 2GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स उपलब्ध आहेत. याशिवाय यूझर्सना SonyLIV आणि Disney+ Hotstar चे 90 दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. हा प्लॅन मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उपलब्ध असेल
