दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची निदर्शने, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी…
जालना– छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली
निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली. दरम्यान औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली, एवढेच नव्हे तर हिंदू आणि शीख धर्मीयांना असह्य यातना दिल्या. अनेक मंदिरे उध्वस्त केली, हिंदू लोकांना धर्म परिवर्तन घडवण्यासाठी औरंगजेबाने छळ केला .असे असतानाही या औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यादेवी नगर येथे झाल्यानंतरही त्याचे प्रेत छत्रपती संभाजी नगर येथे आणून दफन केले. त्यामुळे औरंगजेबाची छत्रपती संभाजी नगर येथील कबर नष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने जर याची दखल घेतली नाही तर ज्याप्रमाणे कार सेवा करून बाबरी मज्जिद उध्वस्त केली त्याचप्रमाणे ही कबर देखील नष्ट केली जाईल असा गर्भित इशाराही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे
