दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील वझरगा ते तुपशेळगावच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झाडी व झुडपांनी मोठा विळखा घातला आहे.
त्यामुळे सदरील रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरू लागले आहे. तुपशेळगाव गावच्या हद्दीतील रस्त्यावर धोकादायक वळण आहे. या धोकादायक वळणाच्या ठिकाणी काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे विभागाने रस्त्याच्या बाजूची काटेरी झुडपे काढने अगत्याचे ठरते.
वझरगा ते तुपशेळगाव दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. शिवाय या रस्त्याला अनेक ठिकाणी धोकादायक वळणेही आहेत. काटेरी झुडपांमुळे समोरून आलेले भरधाव वाहन वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने भविष्यात या ठिकाणी झुडपांमुळे भीषण अपघात होऊ शकतो. या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहन रस्त्याच्या कडेला उभी करणे जिकिरीचे ठरू लागले आहे. अनेक वेळा या झुडपांचा मार प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यालगतची काटेरी व साधी झुडपे ताेडून हा मार्ग साफ करण्यात यावा.अशी मागणी तुपशेळगाव गावांमधील नागरिक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. प्रशासनाने हे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात होणाऱ्या जीवित व वित्तहानीपासून बचाव करावा.अशी अपेक्षा सर्वत्र नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
